About this video : -
यंदाचे वर्ष मागे सरतंय ... नवीन वर्ष सुरू होतंय ..... तुमचे अनेक संकल्पही नवीन वर्षाच्या निमित्तानं सुरू झालेच असतील . नवे दिवस , नवे महिने , नवे ऋतू आणि बरंच काही ..... येणाऱ्या दिवसांच्या खऱ्या अर्थानं आनंद लुटण्यासाठी तुम्ही सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे .... आणि त्यासाठी फार काही मेहनत घ्यायचीही गरज नाही .अगदी सोप्या आणि छोटया उपयांमधून तुम्ही स्वतःला सकारात्मक ठेवू शकता ....