दिवाळीच्या निमित्ताने घरामध्ये काना कोपरा साफ करण्यापासून ते अगदी फराळ, आकाशकंदील, भव्य रांगोळ्या, रोषणाई यांची तयारी सुरू होईल. साधारण आठवडाभर चालणार्या या सणाच्या निमित्ताने दिवाळी 2020 मध्ये नरकचतुर्दशी, दिवाळी पाडवा, लक्ष्मीपुजन, भाऊबीज, पाडवा, धनत्रयोदशी आणि वसूबारस हे वेगवेगळे सण कधी आहेत ते आज जाणून घेऊयात.