मराठा समाजासाठी राज्य शासनाने EWS चा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे मराठा समाजाच्या आऱक्षणाला फटका बसण्याची शक्यता खासदार संभाजीराजे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे जर आर्थिक मागास वर्गाच्या सवलतीमुळे मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असेल असं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
#SambhajiRaje #Maratha #MarathaAarakhan #UddhavThavkeray #Reservation