नाशिक : चित्रा वाघ यांनी गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी केली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात चित्र वाघ या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरलेली आहे. त्याचवेळी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे. आज चित्रा वाघ नाशिकमध्ये असून त्यांनी पत्रकारांशी थेट संवाद साधला.
व्हिडिओ - सोमनाथ कोकरे