पन्हाळा गडाला काल रात्रभर जोरदार वाऱ्याने झोडपले. गेले आठ दिवस गडाला धुक्याने वेढलेले असून रस्त्यावर प्रखर दिवे लावून वाहनांची वाहतूक सुरू आहे. गडावर येण्यास पर्यटकांना बंदी असल्यामुळे सर्व व्यवहार थंडावले आहेत. शासकीय कार्यालये तेवढी चालू असून पक्षकारांची किरकोळ ये जा सुरू आहे. पावसाबरोबर थंडीनेही हातपाय पसरायला सुरुवात केल्याने पन्हाळगड शांत शांत बनला आहे. यंदा मात्र, लाॅकडाऊनमुळे तरूणाईला पन्हाळ गडावरील धुक्याचा आनंद घेता येत नाही.