लग्नसराईत वाद्यकलाकारांची जुगलबंदी | Pune | Maharashtra | Festival | Sakal | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 675

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर तब्बल आठ महिऩ्यांनी वाद्यकलाकांराची वाद्य घुमू लागली आहेत. सनईच्या सुरात ताशा संबळाच्या तालावर वेगवेगळ्या मंगलमय गीतांवर पुन्हा एकदा शौकीनांच्या माना डोलाऊ लागल्या आहेत. या मंगलमय वाद्याने विवाह मुहर्त अन लग्नसराई सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळू लागले आहेत.
कार्तिकी एकादशीनंतर व्दादशीला तुळशीविवाह झाला की सर्वत्र लग्नसराईला सुरवात होते. कार्तिकी एकादशी व व्दादशी गुरूवार ( ता. 26 ) एकाच दिवशी आल्या आहे. त्यामुळेच या दिवशी तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नसराईला सुरवात होत आहे. यंदाचा लग्नाचा पहिला मुहुर्त शुक्रवार ( ता. 27) असून कोरोनामुळे धामधूम नसली तरी साध्या पध्दतीने विवाहाची गर्दी यादिवशी पहावयास मिळू लागली आहे. शियनी (आषाठी) ते प्रबोधिनी (कार्तिकी) यंदा पंचागांत गौण व आपत्कालीतील मुहुर्त दिल्याने चातुर्मासासह गुरू शुक्र अस्त काळातही विवाह होत आहेत. नेहमी तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सुरवात होते. त्यानुसार यंदाची लग्नसराई शुक्रवारपासून सुरू होत आहे. कोरोनामुळे विवाहासाठी नियम व अटी असल्याने धुमधडाक्यात होणारे विवाह साध्या पध्दतीने करावे लागत आहेत. मंगल कार्यालयांनाही केवळ पन्नास जणांच्या उपस्थितीतच विवाह समारंभास परवानगी दिल्याने अडचणी आहेत. विवाह मुहुर्त भरपूर असल्याने दरवेळी गुरू- शुक्र अस्त व अन्य काही धार्मिक कारणास्तव विवाह मुहुर्त दिले जात नसत. परंतू यंदा मुख्यकालातील मुहुर्तासह गौण व आपत्कालीन काळासाठी वेगळे मुहुर्त दिल्याने विवाह इच्छुकांचे मनोरथ पूर्ण होण्यास अडचण नाही. या मुख्यकालानुसार 30 जूनला थांबलेली लग्नसराई शुक्रवार पासून सुरू होत आहे. फेब्रुवारीनंतर गुरू शुक्र अस्त असल्याने मुहुर्त नाहीत. परंतू या काळात गौण व आपत्कालीन मुहुर्त दिलेले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेल्या आठ महिन्यापासून विवाह थांबून लग्नसराई बंद पडली होती. सध्या कोरोनाची स्थिती मंदावली असल्याने पुन्हा लग्नसराई साध्या पद्धतीने सुरू झाली आहे. त्यामुळेच ताशा संबळ वाद्याला मागणी येऊ लागली आहे. मंगलमय वातावरणात नियम पाळून होत असणाऱ्या विवाहांमुळे वाद्य कलाकाकांना पुन्हा अच्छे दिन येतील.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS