Tell Me Your Story : डिप्रेशन दूर करायचे 'राज'; पुण्यातील तरुणाचे कौतुकास्पद 'मिशन'

Sakal 2021-04-28

Views 1.2K

तुम्हाला नैराश्य आले आहे का? तुम्हाला सतत एकटेपणा जाणवतो का? तुमच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येतात का? तुम्हाला जाणावणाऱ्या एकटेपणाचे मुख्य कारण
म्हणजे तुमच्याजवळ कोणी बोलायला नाही? तुमचे म्हणणे ऐकून घेणारे कोणीही जवळ नाहीये. पण तेच तुमच्यासोबत कोणी आपुलकीने बोलणार असेल, तुम्हाला आजिबात जज् न
करता तुमचे म्हणणे ऐकूण घेणारा कोणी अनोळखी व्यक्ती भेटला तर...? तुम्हाला नक्कीच चांगले वाटेल, हो ना! तुमच्या मनातील सगळ ऐकूण घेणारा असा एक व्यक्ती तुम्हाला
पुण्यात एफसी रोड येथे भेटेल. तुम्हाला फक्त त्याला भेटायचे आहे आणि तुमच्या मनातील सार काही त्याला सांगायचे आहे. तुमचे सारे म्हणणे तो शांतपणे ऐकतो आणि तुम्हाला 10
रुपये सुध्दा देतो. तुम्हाला चेष्टा वाटतेय ना? चेष्टा नाही पण हे खरंचं आहे.

पुण्यात सध्या सोशल मिडियावर ''Tell Me Your Story and I Will give You 10 Rupees'' असा बोर्ड हातात घेऊन थांबलेल्या मुलाचे फोटो व्हायरल होत आहे. त्याचे नाव
आहे राज विनायक डगवार. पीआयसीटी (Pune Institute of Computer Technology) कात्रज, येथे कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षाचा अभ्यास करणारा हा विद्यार्थी.
वीक एंडला किंवा जमेल तेव्हा तो एफसी रोडला हा बोर्ड हातात घेऊन थांबतो. त्याकडे येणाऱ्या लोकांशी तो आपुलकीने बोलतो, त्यांच्या मनातील दुखं व्यक्त करण्यासाठी त्यांना
मदत करतो आणि त्यांचे म्हणणे फक्त शांतपणे ऐकूण घेऊन घेतो. त्यानंतर त्याच्याकडे बोलायला येणाऱ्या व्यक्तीला साहाजिकच मन मोकळं करुन खूप हलकं वाटते.

सध्या लॉकडाऊनच्या काळात लोकांमध्ये डिप्रेशन, एकटेपणाची भावना जास्त जाणवत आहे. नैराश्य आणि एकटेपणामुळे काहींनी आत्महत्या देखील केल्या आहेत. असेच एकटेपणा
आणि नैराश्य राजला देखील जाणवत होते. आपल्याला कोणाशी तरी बोलायचे आहे, कोणाला तरी मनातील सांगायचे असे तेव्हा त्याला जाणवत होते. सोशल मिडियावर 'Tell Me Your Story and I Will give You 1 Dollar' असा परदेशातील एका व्यक्तीचा फोटो त्यांने पाहिला आणि त्याने ठरवले की, आपणही लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायचे. लोकांना जाणवणारा एकटेपणा दुर करण्यासाठी, नैराश्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्याने मदत करण्याचे ठरवले. नुसते ठरवलेच नाही तर ते त्याने करुनही दाखवले. त्याच्या या प्रयत्नाला लोकांनीही चांगला रिस्पॉन्स दिला. काही लोका

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS