अकोला : ''राज्यात यापुढे लॉकडाउनमध्ये वाढ करू नका, नागरिक कोरोना ऐवजी बेरोजगारी व उपासमारीने मरतील,'' असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्यांनी लॉकडाऊन मुदतवाढीला जोरदार विरोध केला आहे. ३१ जुलैनंतर राज्यात लॉकडाउन वाढवू नये. अन्यथा रस्त्यावर उतरुन विरोध करु. सरकार गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवत आहे. मात्र ती भीती आम्हाला दाखवायची नाही. माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #Prakash Ambedkar #Lockdown