Pune : मोदी सरकार स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याच्या तयारीत
पुण्यासह शंभर शहरांची झाली पिछेहाट
काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांचा आरोप
अँकर-
स्मार्ट सिटी योजना ही मोदी सरकारची निव्वळ जुमलेबाजी होती हे उघड होऊ लागले असून अपयशी सरकार योजनाच गुंडाळण्याच्या तयारीत आहे, अशी टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
फार मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४-१५ साली स्मार्ट सिटी योजनेचे पुण्यात उदघाटन केले.जाहीर केली. या योजनेत देशभरातील १०० शहरांचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्रातील पुण्यासह १० शहरे निवडण्यात आली. ही योजना म्हणजे मोदी सरकारचा जुमला आहे असे कॉंग्रेस पक्षाने तेव्हाच म्हटले होते. ते खरे ठरू लागले आहे.केंद्र सरकारने योजना पाच वर्ष मुदतीची जाहीर केली. जून २०२१मध्ये योजनेची मुदत संपते आहे, पुण्यासह शंभर शहरे योजनेला मुदतवाढ मिळेल अशा प्रतीक्षेत आहेत पण मोदी सरकार योजना गुंडाळण्याच्या तयारीत आहे,
मोदी सरकारने शहरांची फसगत केली, असा आरोप मोहन जोशी यांनी केला.
बाईट- मोहन जोशी,
माजी आमदार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस