नांदेड(Nanded); राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagat Singh koshyari) नांदेडमध्ये पोहोचले आहेत. आजपासून ते नांदेड,(Nanded) हिंगोली(Hingoli) आणि परभणीच्या(Parbhani) दौऱ्यावर आहेत. नांदेड दौऱ्यानंतर उद्या हिंगोली आणि परभणीचा दौरा ते करणार आहेत. मात्र राज्यपालांच्या दौऱ्यावर राज्याच्या मंत्रिमंडळानं या दौऱ्यावर आक्षेप घेतला होता. यासंदर्भात नाराजीही बोलून दाखवली. मात्र राज्यपाल दौऱ्यावर कायम आहेत. राज्यपाल आणि राज्य सरकार संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्यपालांच्या दौऱ्यावर तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांनी बहिष्कार टाकलाय.. मात्र राज्यपाल जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेणार आहेत. . करोना, पूर परिस्थिती यासारखे सर्व महत्वाचे विषय राज्य सरकार योग्यपणे हाताळताना राज्यपाल बैठका का घेत आहेत, असा सवाल सरकारकडून उपस्थित करण्यात आला आहे.
#Nandedcity #BhagatSinghKoshyari #Koshyarivisitsnanded #nandednews #nandedliveupadtes