अमरावती(Amaravati) : मोदींच्या नावाने मते मागायची, सीट आल्या तर त्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडे जायचे, मी सर्वाला साक्षी आहे. चार वाजता देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) व उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची प्रेस होती. त्यावेळी उद्धवजी म्हणाले, मी माझी प्रेस करतो. त्यात आम्हाला सर्व मार्ग खुले आहेत, असे त्यांनी सांगितले. मग युती कशाला केली? असा सवाल करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील(Chandrakant Patil) यांनी आज शिवसेनेवर(Shivsena) सडाडून टीका केली.
हा विश्वासघात आहे की नाही, याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात की आणखी काही? विश्वासघाताचेच नाव पाठीत खंजीर खुपसणे आहे की नाही? मग मी काय चुकीचे बोललो, असा सवालसुद्धा त्यांनी केला.
आम्हाला आता कुणाकडून फसविल्या जायचे नाही. आम्ही एकट्यानेच लढणार, असेही ते म्हणाले.
काहीही झाले तर त्यांचे डोके खराब झाले आहे, त्यांना झोप येत नाही, त्यांच्या पोटात दुखत आहे, असे महाविकास आघाडीवाले सांगत सुटतात, हे काय डॉक्टर आहेत? अशी टीकासुद्धा त्यांनी शिवसेनेवर केली. ५६ सीटवर मुख्यमंत्री होता व १०५ सीट घेणाऱ्यांना टाटा बाय बाय करता, हा विश्वासघात नाही काय? असा सवालसुद्धा त्यांनी केला.
#devendrafadnavis #chandrakantpatil #shivsena #uddhavthackeray