Pune: पुण्यात तरसाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

Sakal 2021-09-06

Views 2.1K

पुण्यात(Pune) तरसाच्या(Hyena) हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झालेत. खेड(Khed) तालुक्यातील खरपुडी(Kharpudi) गावात घडलेली हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. एक तरुण वेळीच मदतीला धावल्याने वृद्ध सुदैवाने बचावले आहेत. सैरावैरा धावणाऱ्या तरासाची अज्ञात वाहनाला धडक लागली आणि त्यात तरसाचा मृत्यू झाला. काल ही घटना घडली. कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडीओमध्ये एक वृद्ध रस्त्यावरून पायी निघालेले दिसतायेत. तेंव्हा लगतच्या झुडपातून अचानकपणे तरस बाहेर आला. पुढे पायी निघालेल्या वृध्दाचा हात त्याने अक्षरशः जबड्यात धरला. गावातील तरुण हातात काठ्या घेऊन याच तरसाच्या शोधात होते. सुदैवाने एक तरुण तिथंच तरसाचा शोध घेत होता. त्या तरुणाने तरसाला हुसकावून लावण्यासाठी काठीने प्रहार केला. काही वेळाने तरस धावला पण त्याने वृद्धाला गंभीर जखमी केले होते. तिथंच असणाऱ्या एकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात हा सर्व थरार कैद झाला. तसेच दुचाकीवरील आणखी एका व्यक्तीला चावा घेतला. नंतर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाच्या तोंडाला जबर मार लागला आणि जखमी अवस्थेतील तरसाचा नंतर मृत्यू झाला. अशी माहिती खेड वनविभागाने दिली.
#pune #khed #kharpudi #punenews #punehyenaattack #kharpudinews #wildanimals

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS