अकोला - स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात शौचालय बांधणीस वेग आला असतानाही अनेकांनी अजुनही शौचालय बांधलेले नाहीत. ग्रामस्थांना शौचालयांचे महत्व पटविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जागर सुरु केला आहे. एका घरासमोर गाडी उभी होती, घरात कुलर होता, टीव्ही होता पण शौचालय नसल्याचे पाहून त्याच घरमालकाच्या गाडीवर बसून ‘हॉर्न’ वाजवित जिल्हाधिका-यांनी शौचालय बांधण्यासाठी जागर केला.