राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगळवारी ( 3 ऑक्टोबर ) कळवा रेल्वे स्थानकात रेल रोको केला जाणार आहे. एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेला प्रशासन जबाबदार आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.