वड़ा पाव विकून कमवतोय करोडो रूपए | लोकमत मराठी न्यूज़ | रोचक माहिती मराठी मधे

Lokmat 2021-09-13

Views 1

देशा बाहेर विकतोय वडापाव आणि कमवतोय डॉलर | लोकमत मराठी न्यूज़

मुंबई मध्ये वडापाव माहित नाही असा कदाचित परग्राहीच असू शकतो. मुंबई मधील सगळ्यात जास्त खपाचे व गरिबांचे प्राथमिक अन्न समजल जाणारा वडापाव आता सातासमुद्रा पार गेला आहे. २००९ आर्थिक मंदीचा फटका अख्ख्या जगाला बसला होता, तसाच तो सुबोध जोशी आणि सुजय सोहानी या दोघांनाही बसला होता. पण या परिस्थितीतून सावरण्यासाठी वडापाव त्यांच्यासाठी आधार’वड’ ठरला. मुळचे मुंबईकर असलेले हे दोघे लंडनमध्ये वडापाव विकून तब्बल ४.३९ कोटी रुपये कमवत आहेत. कमी भावात वडा-पाव विकण्यासाठी जागा शोधणे कठीण काम होते. बऱ्याच दिवस शोधल्यानंतर एका आइस्क्रिम कॅफेने सुजय आणि सुबोधला जागा दिली आणि त्या बदल्यात ३५ हजार रुपये महिना भाडे सांगितले. १ पाउंड म्हणजे ८० रुपयांत वडापाव तर, १.५० पाउंड म्हणजे १५० रुपयांत दाबेली विकण्यात त्यांनी सुरुवात केली. दरम्यान, फायदा न झाल्याने त्यांनी इंडियन बर्गर सांगत फ्रीमध्ये वडा-पाव आणि बर्गर टेस्टसाठी दिले. हळूहळू लंडनच्या लोकांना वडापावची चव आवडायला लागली. नंतर एका पंजाबी रेस्टॉरेंटने त्यांना एकत्र व्यवसाय करण्याची ऑफर दिली. अशारितीने त्यांच्या वडापाव स्टॉलचे रुपांतर एका रेस्टॉरंटमध्ये झाले होते. आता सुजय आणि सुबोधच्या रेस्टॉरंटच्या तीन ब्रांच आहेत, ज्यामध्ये ३५ लोक काम करतात. त्यांच्या मेन्यूकार्डमध्ये आता जवळपास ६० प्रकारच्या इंडियन स्ट्रीट फूडचा समावेश आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS