टोकियो मधील फिलीपीन्सपासून जवळ पॅसिफिक महासागरात मालवाहतूक जहाज बुडाले असून त्यावरील अकरा भारतीय अद्याप बेपत्ता आहेत. या भागात आलेल्या जोरदार वादळामध्ये हे जहाज अडकून बुडाल्याचे जपानच्या तटरक्षक दलाने सांगितले.
एमराल्ड स्टार असे या हॉंगकॉंगच्या 33 हजार टनी जहाजाचे नाव आहे. या जहाजावर एकूण 26 भारतीय होते. मात्र, इतर जहाजांवरील कर्मचाऱ्यांनी 15 जणांना वाचविले. बेपत्ता भारतीयांच्या शोधासाठी दोन गस्ती नौका आणि तीन विमाने रवाना झाली असली तरी वादळामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews