उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष दीपक पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात छत्तीसगढचे क्रीडा मंत्री भय्या लाल रजवाडे यांनी म्हंटले कि अविवाहितांना भाजपमध्ये चांगले भविष्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदाहरण देत रजवाडेंनी हे विधान केले..भाजपमधील अविवाहितांच्या भविष्याबद्दल रजवाडे भरभरुन बोलत होते. ‘भाजपशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री अविवाहित आहेत. उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्षदेखील अविवाहित आहेत,’ असे रजवाडे म्हणाले. रजवाडे यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. भय्या लाल रजवाडे याआधीही अनेकदा चर्चेत राहिले आहेत.विवाहित असो व अविवाहित राजनीती सगळ्या करताच तलवारीच्या धारेवर चालण्या सारखे असते .
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews