‘ब्रेकअप’ झाल्यानंतर कित्येक दिवस तरूण-तरूणी या धक्क्यातून सावरत नाहीत. जो जोडीदार आपल्याला हवाहवासा वाटतो, ज्याच्यासोबत आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण आपण जगतो, कालांतराने त्याची प्रत्येक आठवण आपल्याला सुईसारखी बोचू लागते. त्याने प्रेमाने दिलेल्या वस्तू तितक्याच त्रासदायक वाटू लागतात, त्या कुठेतरी फेकून द्याव्यात, नजरेपासून त्यांना दूर करावं अशी तीव्र भावना त्याक्षणी मनात निर्माण होतात. पण व्हिएतनाममधल्या एका तरूणानं आपलं दु:खं हलकं करण्यासाठी हटके उपाय शोधून काढलाय. त्यानं चक्क आपल्या गर्लफेंड्नं दिलेल्या वस्तू बाजारात विकायला काढल्या.वस्तू फेकून दिल्या तर त्या फक्त नष्ट होतील, त्यापेक्षा एखादी गरजू व्यक्ती त्याचा चांगला वापर करेल या हेतूने डिन्ह थांग या तरुणानं प्रेयसीनं दिलेल्या सर्व वस्तू विकायला काढल्या
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews