दीया मिर्जाने पर्यावरणाबाबत नेहमी आग्रही भूमिका घेतली आहे. अगदी करिअरच्या सुरूवातीला जेव्हा ती बॉलिवूडमध्ये नवखी होते. तेव्हाही तिने पर्यावरण रक्षणाबाबत आग्रही भूमिका घेतलेली असायची.ती म्हणाली की ज्या वस्तू पर्यावरणाला धोका पोहोचवतात त्या मी वापरत नाही. अगदी सॅनिटरी नॅपकीनसुद्धा. दीया सांगते की,सॅनिटरी नॅपकीन पर्यावरणाला प्रचंड प्रमाणात प्रदूषित करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या सॅनिटरी नॅपकीनचा वापर मी बंद केला आहे. तसेच, मी इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकीन वापरते. आमच्या देशात स्त्रीयांच्या आरोग्य रक्षणासाठी उपलब्ध असलेले सॅनेटरी नॅपकीन आणि डायपर मोठ्या प्रमाणात पर्यावरणास हानी पोहोचवतात. तसेच, वातावरणही दूषीत करतात. यामुळे मी मासिक पाळीच्या काळात सॅनेटरी नॅपकीन वापरने बंद केले आहे. एक अभिनेत्री म्हणून माझे हे म्हणने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण, आम्ही सॅनेटरी नॅपकीनची जाहिरातही करतो. मला जेव्हा केव्हा सॅनिटरी नॅपकीनची जाहिरात करण्याची ऑफर येते तेव्हा मी त्यास थेट नकार देते. दीयाने सांगितले की, ती सॅनिटरी नॅपकीनऐवजी 100 टक्के विघटन होणारे बायोडिग्रेडबल नॅपकीनचा वापर करने सुरू केले आहे. पूर्वीच्या काळात आपल्या देशातील महिला मासिक पाळीच्या काळात कॉटनचा वापर करत असायच्या. पण, कालांतराने परिस्थितीत बदलली. अशा काळात वापरण्याच्या वेगवेगळ्या वस्तू आल्या. अलिकडील काळात तर, इतकी प्रगती झाली आहे की, पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचणार नाही, अशी नॅपकीन उपलब्ध होऊ लागली आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews