ह्या जगात कोण कधी आणि कसा वागेल ह्याचा काही भरवसा नाही.पुरुषांसारखा वेश परिधान करून आणि पुरुष असल्याचं भासवून तामिळनाडूमधल्या एका तरुणीनं चक्क तीन तरुणींशी विवाह केला.
रामदेवी ही तामिळनाडू मधल्या एका गिरणीत काम करते. याचदरम्यात तिची ओळख एका तरुणीशी झाली. तरुणीदेखील या गिरणीत काम करायची. रामदेवी पुरुषांसारखे कपडे परिधान करायची, तिचं वागणंही पुरुषांसारखंच होतं. त्यामुळे ही तरुणी तिला पुरुषच समजू लागली. या दोघांच्या ओळखीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करायचं ठरवलं. ‘डेक्कन क्रॉनिकल’च्या माहितीनुसार लग्नाच्या दोन महिन्यानंतर या तरुणीला रामदेवी ही पुरुष नसून ती महिला असल्याचं समजलं. आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात येताच या तरुणीनं आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. तिच्या कुटुंबीयांनी ताबडतोब याची पोलिसात तक्रार दाखल केली.पोलीस जेव्हा रामदेवीच्या शोधात तिच्या मूळ गावी पोहोचले तेव्हा तिनं फसवून आणखी दोन लग्नं केली असल्याची धक्का दायक बाब पोलिसांना समजली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews