येत्या वर्षात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर सर्वात आधी पैशांची बचत करायला शिका. वायफळ खर्च टाळा.आपण नोकरी किंवा उद्योग करतो तो पैसे कमावण्या साठी. यामुळे या पैशांचा वापर योग्य ठिकाणी आणि योग्य पध्दतीनेच होतोय ना हे पाहण्यासाठी बँकेची स्टेटमेंट तपासत राहा. बऱ्याचवेळा आपल्या खात्यातून पैसे कापले गेले आहेत हे आपल्याला माहितच नसत. यामुळे हे पैसे कुठे ,का, कशासाठी व किती कापले गेलेत ते बँकेची स्टेटमेंट तपासल्यावर कळेल.बचत व गुंतवणुकीशी संबंधित बातम्या वाचल्याने सरकारच्या बचतीशी संबंधित नवीन योजना कळतात.आपले पैसे कोणत्या टॅक्ससाठी कापले जात आहेत याबदद्ल माहिती मिळवत राहा.कागदोपत्री मिळणारा पगार आणि हातात पडणारा पगार यात फरक असतो. पीएफ ग्रज्युईटी व इतर फंडांबरोबरच कर्जाची रक्कमही पगारातून कापली जाते. यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्या. पैसा साठवल्याने वाढत नाही. तर गुंतवल्याने वाढतो हे समजून घ्या. आरडी, एफडी, म्युच्युअल फंड, एसआयपी या साऱख्या योजनांमध्ये पैसे गुंतवा. पण त्याआधी तज्ज्ञ व्यक्तीकडून माहिती करुन घ्या.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews