प्रकाश राज मोदी सरकारवर टीका केल्यामुळे सातत्याने चर्चेत असतात.आपल्याला वारंवार धमकी दिल्यास राजकारणात प्रवेश करण्यास कचरणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
बेंगळुरू येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत प्रकाश राज म्हणाले, राजकारणात उतरण्यात मला रस नाही. पण जर मला वारंवार धमकी दिली, जर कोणी माझ्यावर सातत्याने दबाव टाकू लागला तर मी निश्चित राजकारणात प्रवेश करेल.
कर्नाटकमध्ये याचवर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकी आधी ते काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवाद आणि हिंदुत्व सारखेच असल्याचे म्हटल्याने प्रकाश राज यांनी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना लक्ष्य केले होते. सेक्युलर लोक निधर्मी असतात, हा अनेकांचा गैरसमज आहे. इतर धर्मांचा आदर करणे, हा सेक्युलरिझम चा खरा अर्थ असल्याचे प्रकाश राज यांनी म्हटले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews