बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्या तील एका प्रकरणात सीबीआय च्या विशेष न्यायालयाने साडे तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याबरोबरच त्यांना ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.विशेष म्हणजे लालूप्रसाद यांना या प्रकरणी जामीन मिळणार नाही. यासाठी त्यांना वरच्या कोर्टात जावे लागणार आहे. देवघर कोषागारातून अवैध मार्गाने ८९.२७ लाख रुपये काढल्याप्रकरणी रांची कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते अशी शक्यता कायदेतज्ज्ञ व्यक्त करत होते. मात्र आपल्या तब्येतीचे कारण देत लालूप्रसाद यादव यांनी शिक्षा कमी करण्याची विनंती कोर्टाला केली होती. ३ जानेवारीला या प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार होती, मात्र हा एक-एक दिवस पुढे ढकलला जात होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews