पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या एका फोन कॉलमुळे ४ हजारांपेक्षा जास्त भारतीय आणि विदेशी नागरिकांचा जीव वाचला, असा खुलासा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केला आहे.२०१५मध्ये सौदी अरबकडून येमेनवर वारंवार बॉम्बनं हल्ले करण्यात येत होते. त्यावेळी भारतीयांना येमेनमधून बाहेर काढणं जवळपास अशक्य होतं. म्हणून मी पंतप्रधानांना सौदीच्या शाहशी बोलायला सांगितल्याचं सुषमा म्हणाल्या. मोदींनी शाहला फोन केल्यानंतर एका आठवड्यासाठी सकाळी ९ ते ११ दरम्यान बॉम्ब हल्ले थांबवण्याचा निर्णय शाहनं घेतल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगतिलं.२०१५मध्ये 'ऑपरेशन राहत'च्या माध्यमातून भारतानं येमेनमधून ४,८०० भारतीय आणि १९७२ परदेशी नागरिकांना वाचवलं होतं. आसियान-भारत प्रवासी दिवसाचा कार्यक्रम सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आला होता
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews