साऊथ आफ्रिका दौ-याची टीम इंडियाची सुरूवात जरा निराशाजनकच झाली आहे. पहिलाच टेस्ट सामना गमावल्याने टीम इंडियाला आता वापसी करणे जरा कठिण आहे.मात्र अशक्य नक्कीच नाही. अशात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने एक असं वक्तव्य केलं ज्याने टीम इंडियातील खेळाडूंचा आत्मविश्वास दुप्पट होईल पहिल्या सामन्यात चार विकेट घेणारा बुमराह म्हणाला की, ‘एका सामन्याने आत्मविश्वास डगमगत नाही. जर तसे झाले तर तुम्ही खेळण्याचे हकदार नाहीत. चुकांमधून शिका आणि पुढे जा. कोणताही क्रिकेटर असा नाहीये ज्याने चूक केली नाही. तो चांगला टेस्ट सामना होता आणि मी त्यातून खूप काही शिकलो. कारण मी याआधी कधीही साऊथ आफ्रिकेत खेळलो नव्हतो. आता ही वेळ पुढे जाण्याची आणि दुस-या सामन्याबद्दल विचार करण्याची आहे’
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews