पॅन कार्ड कसं बनवायचं याची असंख्य लोकांना चिंता असते. केंद्र सरकारने उमंग नावाचं विविध शासकीय सेवा सहजगत्या मिळण्यासाठी सुरू केलेलं अॅप पॅन कार्ड घरबसल्या मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. या अॅपच्या नोंदणीसाठी तुमचा आधार क्रमांक आवश्यक असतो. आधार क्रमांक दिल्यानंतर ओटीपी तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर मिळतो आणि त्यानंतर हे अॅप सुरू होतं. अॅप सुरु झाल्यानंतर तुम्हाला केंद्र सरकारने या अॅपच्या माध्यमातून दिलेल्या विविध सुविधांची माहिती मिळते. अॅच्या वरच्या बाजूला असलेल्या सर्च बॉक्समध्ये जर तुम्ही PAN असा शब्द भरलात तर तुम्हाला पॅन कार्ड काढण्यासाठीच्या तपशीलाकडे हे अॅप वळवतं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews