उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद' चे आवाहन केले होते. त्यानुसार हुतात्मा चौकात राष्ट्रवादीकडून मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार कुणाचंही असो ही जी कृती झाली ती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्रसरकारने जनतेला व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केली आहे.