पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबमधील फिरोजपूरमध्ये रॅली करणार होते. मात्र अखेरच्या क्षणी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. ही रॅली रद्द करण्यामागे सुरक्षेचे कारण सांगण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत काँग्रेसचं 'कारस्थान' केलं आहे. पंजाबच्या काँग्रेस सरकारने मोठी चूक केली आहे. पंतप्रधान मोदींसोबत घडलेल्या या घटनेबद्दल काँग्रेस आणि पंजाब सरकारने देशातील जनतेची माफी मागावी. देशातील जनता काँग्रेसचं कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही. काँग्रेस देशाच्या संवैधानिक संस्थांचा अवमान करत असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले. या संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, पंजाब सरकारने याबाबत माफी मागावी.