Satara News Updates l दुर्लक्षित माणचा समृद्ध प्राचीन इतिहास उजेडात; माणगंगेकाठी सापडला अनमोल खजिना
दहिवडी : दुर्लक्षित माण तालुक्याचा समृध्द प्राचीन इतिहास उजेडात आणण्याचं महत्वपूर्ण काम सुरु असून माणगंगेकाठी सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. यामुळे माणच्या भूमीला वेगळे महत्व प्राप्त होणार आहे. या खजिन्याकडे दुर्लक्ष केल्यास तो संकटात येण्याची अथवा नष्ट होण्याची शक्यता आहे. दहिवडीचे सुपुत्र नुकतेच सेवानिवृत्त झालेले कमांडो सुनिल काटकर हे २००५ पासून संशोधनाचं काम करत आहेत. त्यांना गोंदवले जवळ माण नदीच्या पात्रालगत साधारण दहा ते बारा एकर परिसरात प्राचीन काळातील अवशेष पसरलेले सापडले आहेत. (व्हिडिओ : रूपेश कदम)
#SataraNewsUpdates #SataraLiveUpdates #MaanTaluka #Satara #MarathiNews #MaharashtraNews #BigNews #BreakingNews #esakal #SakalMediaGroup