अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या लुकमुळे अनेकदा चर्चेत असते. आमिर खानच्या दंगल सिनेमातून सान्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. सान्या आज कूल अंदाज पाहायला मिळाली. यावेळी ती ऑल इन व्हाईट लूकमध्ये दिसली. सान्या दंगल, बधाई हो, पटाखा, शकुंतला देवी, ल्युडो या सिनेमात झळकली आहे. तिच्या भूमिकांनाही रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. शकुंतला देवी चित्रपटात सान्या शकुंतला देवी यांची मुलगी अनुपमा बॅनर्जी यांची भूमिका साकारताना दिसली.