काल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार विरोधकांना संपण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप करत रचलेल्या कटाचे 125 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला ‘पेनड्राईव्ह\' सादर केला. त्यावर, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केल्याशिवाय असे रेकॉर्डिंग शक्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.