मुबंई-पुणे एक्सप्रेसवर अपघातात मलायका अरोरा जखमी झाली. बोरघाटात दुपारच्या सुमारास मुबंईकडे जाताना तीन ते चार वाहनांच्या अपघातात अभिनेत्री मलायका अरोरा जखमी झाली. यानंतर मलायकाला मुबंई येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला दुखापात होऊन चार टाकेही पडले आहेत. या अपघातात ह्युडांई कार, रेंज रोव्हर, एक मनसेच्या कार्यकर्त्यांची मुबंई येथे जाणारी बस ही वाहने क्षतीग्रस्त झाली.