Weather Updates | राज्यात 'या' भागात पावसाची शक्यता | Sakal |
वाढत्या उन्हामध्ये विदर्भ होरपळून निघाला आहे. वर्धा येथे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
#Sakal #Weather #Maharashtra #Marathinews #Rain #Vidarbh #Marathilivenews