पुणतांबा इथले आंदोलक शेतकरी मुंबईकडे रवाना झालेत. मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालंय. या बैठकीला आंदोलक शेतकऱ्यांचे दहा प्रतिनिधी, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अन्य मंत्री उपस्थित राहतील. या बैठकीनंतर पुणतांबा इथं ग्रामसभेत आंदोलनाबाबत अंतिम निर्णय होईल.