समृद्धी महामार्ग...! खरं तर हा महामार्ग राज्याचं गणित बदलविणारा असा महामार्ग आहे. या महामार्गामुळे राज्याची प्रगती होणार , आर्थिक गणित बदलणार, राज्याचं पूर्वेकडील टोक पश्चिमेला जलद गतीने जोडलं जाणार. असा हा स्वप्नवत मार्ग... हा मार्ग नागपूर मुंबई पर्यंत सरळसोट असा ७०१ किमी लांबीचा महामार्ग असल्याने यावरील वाहनांचा वेग लोकार्पणापूर्वीच जीवावर बेतायला सुरुवात झालीये... लोकार्पणापूर्वीच हे असं... तर मग हा महामार्ग सुरू झाल्यावर नागरिकांच्या जीविताची हमी कोण घेणार? पाहुयात आमच्या या विशेष रिपोर्ट मधून.