"मी मागील सहा दिवसांपासून नागपुरात होतो. मी दिल्लीत नव्हतो तर माझ्या घरी मीटिंग कशी होऊ शकते? कोणी तरी खोटी अफवा पसरवत आहे. आमच्या सर्व खासदार, आमदार आणि शिवसैनिक यांची इच्छा आहे की ठाकरे आणि शिंदे यांनी एकत्र यावे", अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी दिली.