मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार, कंत्राटी मुख्यमंत्री म्हणत विरोधकांनी टीका केली होती. या टीकेचा शिंदेंनी सभागृहात बोलताना जोरदार समाचार घेतला. "होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे," असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
#EknathShindeCM #UddhavThackarey #maharashtra