गेल्या कित्येक दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक हा चर्चेचा विषय ठरतोय. कारण या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस सोडणाऱ्यांसाठी एक कारण ठरलेला काँग्रेसच्या नेतृत्वाचा प्रश्न अखेर सुटणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये गांधी घराण्यातील कोणीही उभं राहणार नाही. दरम्यान या निवडणुकीसाठी अनेक नाव समोर आली होती, मात्र अखेर काँग्रेसची अध्यक्षपदाची ही निवडणूक तिरंगी असणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.