शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने ते अडचणीत आले होते. शिवसेनेतल्या बंडानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. यावेळी ईडी कारवाई टाळण्यासाठी आपण पाठिंबा देत आहोत, असे संकेतही सरनाईकांनी दिले होते. मात्र आता पुन्हा त्यांच्यावर ईडीचं सावट आहे.