प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि अनेक विषयांवर भाष्य केलं. शिवशक्ती आणि भीमशक्ती येत्या काळात एकत्र दिसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यावरही आज आंबेडकरांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली.दरम्यान ते म्हणाले," महाविकास आघाडीमधील काही घटक यांची माझ्याशी चर्चा झाली. त्या चर्चेत मी महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे का? आणि राहिल्यास त्यात वंचित बहुजन आघाडी कशी समाविष्ट होणार याचा काही आराखडा आखला आहे का अशी विचारणा केली होती”.
#PrakashAmbedkar #EknathShinde #UddhavThackeray #VanchitBahujanAghadi #ShivSena BJP #Maharashtra #DevendraFadnavis #VBA #HWNews