भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले असून त्यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.