कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी जत तालुक्यातील गावांवर दावा सांगितल्यानंतर पुन्हा एकदा कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील काही गावांनी विकासाच्या मुद्यावर महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम देत कर्नाटकात सामील होण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांनी कर्नाटकात जाण्याबाबतचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला आहे.