केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे (Raj Thacheray) यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर या राणे आणि ठाकरे भेटीला विशेष महत्व आहे.
#RajThackeray #NarayanRane #MNS #BJP #HWNews #Shivtirth #Meeting #Maharashtra #Dadar #EknathShinde #DevendraFadnavis