दिव्यशक्ती खरी की खोटी? Bageshwar Dham चे महाराज आणि अंनिसमध्ये आरोप-प्रत्यारोप
अंनिसचे राष्ट्रीय संयोजक श्याम मानव आणि बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोप रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या चमत्काराचा दावा महाराज करतात त्यांनी ते सिद्ध करावं असं थेट आव्हान श्याम मानव यांनी दिलं आहे. तर श्याम मानव यांनी आपल्या समोर येऊन बोलावं. सनातन धर्माविषयी बोलणाऱ्यांना बॅायकॅाट केलं जाईल, असंही धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी म्हटलं. #bageshvardham #andhashradhanirmulansamiti