शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना डिवचलं आहे. यावेळी संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये जाहिरात देऊन शिंदे गटावर निशाणा साधला आहे. यात शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणत त्यांच्यावर जळजळीत टीका करण्यात आली आहे.
#UddhavThackeray #EknathShinde #BalasahebThackerayJayanti #Shivsena #SanjayRaut #Rebelion #Saamana #ShindeGroup #Guwahati #MarathiNews #Viral #SunilRaut #Politics #Maharashtra