संगमनेरमध्ये मतदान केल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की मी काँग्रेस पक्षाचाच फॉर्म भरला होता. मात्र, मला एबी फॉर्म मिळू न शकल्यामुळे तो अपक्ष झाला. संगमनेरच्या शारदा विद्यालय या ठिकाणी मतदान केल्यानंतर विविध विषयांना उत्तर देताना सत्यजित तांबे हे बोलत होते. बाळासाहेब थोरात यांच्याशी काही बोलणं झालं का असं व पत्रकारांनी विचारल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचे ऑपरेशन झालेले आहे, त्यामुळे ते ऍडमिट आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले. तसेच शंभर पेक्षा जास्त संघटनांचा पाठिंबा देखील मिळाल्याचं तांबे यांनी स्पष्ट केलं.
#MLCElection #SatyajeetTambe #NanaPatole #ShubhangiPatil #BJP #Congress #SudhirTambe #Shivsena #Nashik #VidhanParishad #MahaVikasAghadi #Voting #Maharashtra