CM Shinde on Sri Sri Ravi Shankar: मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला गुवाहाटीतील ‘त्या’ फोनकॉलचा प्रसंग!
जालना जिल्ह्यात सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांच्यातर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी 'महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. आज या भूमीमध्ये श्री श्री रविशंकर आले आहेत. आम्ही गुवाहाटीला होतो, तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी मला फोन करुन आशीर्वाद दिला होता. "तुम्ही चांगले काम करत आहात,तुम्हाला यश मिळेल" असं ते म्हणाले होते' असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गुरुदेव चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतात. तो कार्यक्रम त्यावेळी झाला म्हणूनच आज हा कार्यक्रम पार पडत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.