ठाण्याच्या मुब्र्यातील कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे रविवारी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन केले गेले. या भूमीपूजन सोहळ्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच गाजली होती. कारण भूमी पूजन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले, पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी मुंब्रा शहरभर बॅनर मात्र लावले होते. नगरसेवक राजन किणी, अनिता किणी, राजू अंसारी, विशू भागाय आणि मोरेश्वर किणी यांनी हे बॅनर लावले होते. मात्र बॅनरवर राष्ट्रवादी कॅांग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे फोटो त्यावर नव्हते.
#ShivSena #ShrikantShinde #JitendraAwhad #EknathShinde #Mumbra #Thane #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #RavikantTupkar #Buldhana #SushmaAndhare #NCP #Maharashtra