गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा बराच गाजत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचं नाव घेत केलेल्या गौप्यस्फोटानंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे. असं असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अद्यापही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचाच लक्ष लागलं आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथील कार्यक्रमायास अजित पवार आले होते. त्या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांचा बूम पाहताच गाडीत बसून तेथून सरळ निघून गेले.