Kasba Peth Bypoll: Girish Bapat आजारी असतानाही Hemant Rasne यांच्या प्रचारसभेसाठी उपस्थित
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर भाजपाकडून हेमंत रासने यांना तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. याचदरम्यान खासदार गिरीश बापट हे आजारी असताना देखील रासने यांच्या प्रचारसभेत दिसले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच बापट यांची भेट घेतली होती. तर त्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गिरीश बापट यांची भेट घेतली होती. या सर्व घडामोडी लक्षात घेता आणि गिरीश बापट यांची तब्येत पाहता ते कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी होण्याची शक्यता कमी होती. मात्र केसरीवाडा येथे गिरीश बापट हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले.